पारोळ्यानजीक बस-कारचा अपघात : धुळ्यातील तिघे ठार


साखरपुड्याहून परतताना दुर्घटना : मृतांमध्ये नवरदेवाच्या वडिलांसह बहिण व काकूंचा समावेश : तर अन्य तिघे जखमी

पारोळा : तालुक्यातील विचखेडे गावाजवळ भरधाव बस व कारमध्ये धडक होवून झालेल्या अपघातातील धुळ्यातील तिघांचा मृत्यू झाला तर अन्य तिघे जखमी झाले. रविवारी सायंकाळी हा अपघात झाला. या अपघातात पाचोरा येथून साखरपुडा आटोपून धुळ्याकडे निघालेल्या चौधरी कुटुंबातील भावी नवरदेवाच्या वडिलांसह बहिण व काकूचा मृत्यू झाला. या घटनेने धुळ्यातील चौधरी कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

तिघांचा जागीच मृत्यू
धुळ्याकडून भरधाव वेगाने पारोळ्याकडे येणारी शिर्डी-भुसावळ बस (एम.एच.20 बी.एल.3943) ने धुळ्याकडे जाणार्‍या (एम.एच.18 बी.सी.0575) मध्ये समोरा-समोर धडक होवून झालेल्या अपघातात धुळ्यातील भावी नवरदेवाचे वडील संजय नारायण चौधरी (45), बहिण मीनल संजय चौधरी (23) व काकू सरला रवींद्र चौधरी (वय 45) हे जागीच ठार झाले तसेच नवरदेवाच्या आईसह काका व पुतण्या हे गंभीर जखमी झाले. धुळ्यातील चौधरी कुटुंब पाचोरा येथे साखरपुड्याच्या कार्यक्रमाहून परतताना हा अपघात झाल्याचे सांगण्यात आले. पारोळा पोलिस ठाण्यात या प्रकरणी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !