कामायनी एक्सप्रेसमधून पडल्याने खंडव्यातील दोघा तरुणांचा मृत्यू


Two youths from Khandwa died after falling from Kamayani Express भुसावळ : धावत्या रेल्वेतून तोल जावून पडल्याने खंडव्यातील दोघा तरुणांचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी रावेर रेल्वे स्थानकाजवळील रेल्वे बोगद्याजवळ घडली. एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्‍याचा उपचारार्थ हलवताना मृत्यू झाल्याचे सूत्रांनी सांगितले. मोनू मंडल व आकाश वैद्य (दोन्ही रा.खंडवा) अशी मयतांची नावे आहेत तर दोघे संगीत पथकात वादक असल्याची माहिती आहे.

तोल गेला अन जिवाला मुकले
मोनू मंडल व आकाश वैद्य हे खंडवा येथून कामायनी एक्स्प्रेसने भुसावळ येथे एका लग्न समारंभासाठी येत होते मात्र कामायनीला प्रचंड गर्दी असल्याने दोघे तरुण दरवाजात उभे होते मात्र रेल्वे बोगद्याजवळ दोघांचा तोल गेल्यानंतर ते खाली पडले व डोक्याला मार लागल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दुसर्‍या तरुणाला गंभीर जखमी अवस्थेत हरीद्वार एक्स्प्रेसने भुसावळ ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रावेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !