16 अनारक्षित रेल्वे गाड्या महापरीनिर्वाण दिनानिमित्त धावणार
16 unreserved trains will run on Mahaparinirvana day भुसावळ : महापरीनिर्वाण दिनाचे औचित्य साधून गैरसोय टाळण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मुंबई, नागपूर, अजनी, अमरावती, कलबुर्गी, सोलापूर या मार्गावर विशेष 16 अनारक्षित रेल्वे गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे प्रवाशांना महापरिनिर्वाण दिनासाठी जाणार्यांची गैरसोय टळणार आहे.
या गाड्यांचा प्रवाशांना दिलासा
नागपूर-मुंबई ही गाडी नागपूर येथून सोमवार, 4 रोजी रात्री 11.55 वाजता सुटेल तसेच मंगळवार, 5 रोजी सकाळी आठ वाजता दुपारी 3.50 वाजता नागपूर स्थानकावरून सुटेल. अजनी येथून मुंबईसाठी गुरुवार, 7 दुपारी 1.30 वाजता विशेष गाडी सुटेल तर अमरावती येथून मुंबईसाठी मंगळवार, 5 रोजी संध्याकाळी 5.45 वाजता सुटेल तर मुंबई येथून गुरूवारी, 7 ला रात्री 12.40 वाजता सुटेल तर कलबुर्गी येथून मुंबईसाठी मंगळवार, 5 रोजी संध्याकाळी 6.30 वाजता सुटेल तर मुंबई येथून गुरूवार, 7 रोजी रात्री 12.25 वाजता सुटेल. सोलापूर येथून मुंबईसाठी विशेष गाडी मंगळवार, 5 रोजी रात्री 10.20 वाजता सुटेल. मुंबईतून ही गाडी गुरूवार, 7 रोजी रात्री 12.25 वाजता सुटेल. महापरीनिर्वाण दिनाचा कार्यक्रम झाल्यावर मुंबईतून बुधवार, 6 रोजी दुपारी 4.45 वाजता अजनीसाठी गाडी सुटेल. त्याच दिवशी गुरूवार, 6 रोजी मुंबई येथून सेवाग्रामसाठी संध्याकाळी 6. 35 वाजता गाडी सुटेल तर गुरूवार, 7 रोजी रात्री 12.40 वाजता दादर येथून अजनीसाठी विशेष रेल्वे गाडी सोडली जाणार आहे. मुंबई येथून नागपूरसाठी दुपारी 12.35 वाजता गाडी सुटेल तर शुक्रवार, 8 रोजी मुंबई येथून नागपूरसाठी संध्याकाळी 6.35 वाजता गाडी सुटेल. याच दिवशी मुंबई येथून नागपूरसाठी रात्री 12.40 वाजता शुक्रवार, 8 रोजी विशेष गाडी सोडली जाणार आहे. प्रवाशांनी या गाड्यांचा लाभ घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.








