धुळे जिल्ह्यात एकाच दिवसात 381 टवाळखोरांवर कारवाई
महाविद्यालयांभोवती रोमिओगिरी करणार्यांचे दणाणले धाबे
Action against 381 defectors in one day in Dhule district धुळे : धुळे शहरासह जिल्ह्यात महाविद्यालयांभोवती रोमिओगिरी करणार्या तब्बल 381 टवाळखोरांविरोधात धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या आदेशाने कारवाई करण्यात आल्यानंतर टवाळखोरांमध्ये प्रचंड खळबळ उडाली. धुळे जिल्ह्यातील महाविद्यालयांच्या आवारात विद्यार्थी नसताना अनधिकृतपणे वावरणार्या तसेच रोमिओगिरी करणार्या मजनूंना पोलिस दलाने अद्दल घडवल्याने पालकवर्गातून समाधान व्यक्त झाले तर कारवाईतही मात्र सातत्य ठेवण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
पालकवर्गातून कारवाईचे समाधान
महाविद्यालयाच्या आवारात अतिवेगाने वाहन चालवणे, बुलेटचे सायलेन्सर काढून मोठ्या आवाजात वाहन चालवणे तसेच महाविद्यालयाचे विद्यार्थी नसतानाही महाविद्यालयांच्या आवारात फिरून रोमिओगिरी करणार्यांना पोलिस दलाने धडा शिकवला तसेच विद्यार्थिनींना समूपदेशन करीत कुणाकडून काही त्रास होत असल्यास त्याबाबत न घाबरता तक्रार करण्याचे आवाहन करण्यात आले.





या महाविद्यालयात झाली कारवाई
विद्यार्थिनी कॉलेज, एसएसव्हीपीएस कॉलेज, देवपूर धुळे, नॅशनल उर्दू हायस्कूल, चाळीसगाव रोड, भावरी महाविद्यालय धुळे तालुका, सी.एस.बाफना हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, आदर्श हायस्कूल, निजामपूर, गर्ल्स हायस्कूल बीओडी कॉलेज, नूतन महाविद्यालय, दोंडाईचा, सना हायस्कूल, चाळीसगाव रोड, खाजगी क्लासेस, देवपूर, बाफना स्कूल, धुळे शहर, एस.टी.गुजर माध्यमिक विद्यालय व ज्युनिअर कॉलेज, बेटावद, एसएसव्हीपीएस कॉलेज, शिंदखेडा, मुलींचे वस्तीगृह शिरपूर तालुका समुपदेशन, जयहिंद सिनीयर कॉलेज, देवपूर धुळे हआदी ठिकाणी कारवाई करण्यात आली.
