भुसावळात उद्यापासून अंतर्नादची पुष्पांजली प्रबोधनमाला
प्रथम पुष्प ज्ञानेश्वर शेंडे, द्वितीय महेश गोरडे तर तृतीय प्रा.व.पु.होले गुंफणार
Pushpanjali Prabodhanamala of Antaranad from tomorrow in Bhusawal भुसावळ : अंतर्नाद प्रतिष्ठानच्या माध्यमातून भुसावळात माजी खासदार तथा आमदार कृषीमित्र स्व.हरिभाऊ जावळे व स्व.पुष्पा वसंतराव पाटील यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पुष्पांजली प्रबोधनमाला आयोजित करण्यात आली आहे. त्यात भुसावळमधील विद्यालय आणि महाविद्यालयांमध्ये हे व्याख्यान होणार आहेत. यंदा व्याख्यानमालेचे सहावे वर्ष आहे. प्रबोधनमालेचे प्रथम पुष्प गुरुवार, 7 डिसेंबरला सकाळी 11 वाजता पु.ओ.नहाटा महाविद्यालय येथे जळगावातील ज्ञानेश्वर शेंडे हे गुंफतील. ‘ऊर्जा सकारात्मक संवादाची ’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे.
के.नारखेडे विद्यालयात दुसरे पुष्प
शुक्रवार, 8 रोजी दुपारी साडेतीन वाजता द्वितीय पुष्प के.नारखेडे विद्यालयात जळगाव येथील महेश गोरडे हे गुंफतील. ‘यशोशिखराकडे जातांना’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय आहे. तृतीय पुष्प शनिवार, 9 डिसेंबर रोजी सकाळी 9.30 वाजता भुसावळ हायस्कूलमध्ये येथे सावदा येथील प्रा.व.पु.होले हे गुंफतील. तीन्ही व्याख्याने बोचर्या थंडीत ऐकण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळणार आहे. भाजपा जिल्ह्याध्यक्ष अमोल हरिभाऊ जावळे, जळगावचे उद्योजक अजय बढे, दीपस्तंभ फाऊंडेशनचे यजुवेंद्र महाजन यांच्या मार्गदर्शनात ही प्रबोधनमाला होत आहे. प्रकल्पप्रमुख म्हणून शैलेंद्र महाजन, समन्वयक डॉ.संजू भटकर, सहसमन्वयक प्रा.डॉ.श्यामकुमार दुसाने आहेत. प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील यांच्या कल्पकतेतून हा सांस्कृतिक उपक्रम राबवला जात आहे. रसिकांनीही लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष
दरवर्षी ही प्रबोधनमाला भुसावळ शहर व परिसरातील शाळांमध्ये फिरती होते. उपक्रमाचे यंदा सहावे वर्ष आहे. अभिरूची टिकून राहावी, विद्यार्थ्यांमध्ये चांगल्या विचारांची रुजवत व्हावी म्हणून या वर्षी ही प्रबोधनमाला हायस्कुल आणि कॉलेज मध्ये होत आहे, असे प्रकल्प प्रमुख शैलेंद्र महाजन यांनी सांगीतले.
आजपर्यंत यांची झाली व्याख्याने
चांदवडचे विष्णू थोरे, नाशिकचे प्रमोद अंबडकर, एरंडोलचे प्रा.वा.ना.आंधळे, चाळीसगावचे मनोहर आंधळे, धरणगावचे डॉ.संजीवकुमार सोनवणे, वाशिमच्या उज्ज्वला मोरे, भुसावळचे जीवन महाजन, पुण्याचे देवा झिंजाड, अमरावतीचे नितीन देशमुख, सोलापूरचे नितीन चंदनशिवे, जळगावचे मनोज गोविंदवार, पाचोर्याचे रवींद्र पाटील, नागपूरच्या प्रा.विजया मारोतकर, अकोला येथील अनंत राऊत अशा अनेक दिग्गज वक्त्यांची व्याख्याने या प्रबोधनमालेत आजपर्यंत झाली आहेत.
नियोजन समिती
ज्ञानेश्वर घुले, योगेश इंगळे, जीवन महाजन, प्रसन्ना बोरोले, प्रदीप सोनवणे, अमितकुमार पाटील, विक्रांत चौधरी, समाधान जाधव, भूषण झोपे,अमित चौधरी, हितेंद्र नेमाडे, राजेंद्र जावळे, राजू वारके, कुंदन वायकोळे, देव सरकटे, सचिन पाटील, तेजेंद्र महाजन, राहुल भारंबे ,ललित महाजन, निवृत्ती पाटील, जीवन सपकाळे, हरीश भट, संदीप रायभोळे, प्रमोद पाटील, मंगेश भावे, उमेश फिरके, केतन महाजन, चंद्रकांत सूर्यवंशी, अंतर्नाद प्रतिष्ठानचे अध्यक्ष संदीप पाटील.





