शिरपूर शहरात जुगाराचा डाव उधळला : 10 जुगारी कारवाईच्या कोठडीत
Gambling scheme foiled in Shirpur city : 10 gamblers in custody शिरपूर : शिरपूर शहरात रंगात आलेल्या जुगाराच्या डावावर पोलिसांनी धाड टाकत दहा जुगारींना ताब्यात घेतले 49 हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याप्रकरणी शिरपूर शहर पोलिस स्टेशनात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोपनीय माहितीवरून कारवाई
गुरुवार, 7 रोजी अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे यांनी शिरपूर पोलिस निरीक्षक ए.एस. आगरकर यांना शिरपूर शहरातील पाच कंदिल चौकातील बालाजी मंदिराकडे जाणार्या रोडवर अग्रसेन पसंस्थेच्या वरच्या मजल्यावर बंद खोलीत दीपक सुरेश अग्रवाल हा त्याच्या हस्तकांमार्फत अंक सट्ट्याचा जुगार खेळत व खेळवत असल्याची माहिती दिली व त्यानंतर पथकाने छापेमारी केली.





10 जुगार्यांना अटक
पोलिसांनी छापेमारी करीत अग्रसेन पतसंस्थेच्या वरच्या मजल्यावरील दोन हॉलमध्ये दीपक सुरेश अग्रवाल हा त्याच्या 10 हस्तकांसह अंक सट्ट्यांच्या आकड्यांवर जुगार खेळ खेळवत असल्याचे आढळताच पथकाने तीन हजार 240 रुपये रोख, 35 हजार रुपये किंमतीचे सात विविध कंपनीचे मोबाईल, चार हजार रूपये किंमतीचे आठ बटनाचे मोबाईल, दोन प्रिंटर, 10 पॅड, 23 पेन, 14 कॅल्क्युलेटर व अंकसट्ट्यांच्या चिठ्ठ्या असा एकूण 49 हजार 378 रुपये किंमतीची जुगाराची साधने, रोख रुपये व मोबाईल जप्त करण्यात आले व दहा जुगारयांना अटक करण्यात आली.
यांनी केली कारवाई
ही छापेमारी धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर शहर निरीक्षक ए.एस.आगरकर, पोलिस उपनिरीक्षक संदीप मुरकुटे, डी.बी. पथकाचे हवालदार ललित पाटील, रवींद्र आखडमल, योगेश दाभाडे, प्रशांत पवार, वाचक शाखेचे हवालदार जाधव, सोनवणे, मनोज बागुल व पंकज पाटील आदींच्या पथकाने केली.
