सोनगीर पोलिसांनी जप्त केला सात लाखांचा गुटखा
Songir police seized gutkha worth seven lakhs सोनगीर : सोनगीर पोलिसांनी राज्यात प्रतिबंधीत असलेला तब्बल सात लाखांचा गुटखा एका वाहनातून जप्त केला असून चालक व क्लीनरला अटक केली आहे. राज्यात प्रतिबंधीत असलेच्या पानमसाल्यास गुटख्याची वाहतूक हात असताना पोलिसाींन कंटेनर (क्रमांक एम.एच 04 के.यु. 5448) ताब्यात घेतला. त्यातून झेड- 1 , विमल व राजनिवास कंपनीचा तब्बल सहा लाख 61 हजार 320 रुपये किंमतीचा गुटखा जप्त करण्यात आला तसेच 15 लाखांचा कंटेनर जप्त करण्यात आला.
यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, पोलिस उपअधीक्षक सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली सोनगीर पोलीस स्टेशनचे सहायक पोलिस निरीक्षक सचिन कापडणीस, किरण राजपूत, हवालदार नरेंद्रसिंग गिरासे, हवालदार संजय देवरे, नाईक अमरीश सानप, कॉन्स्टेबल राहुल पाटील, विजयसिंग पाटील यांनी केली.





