फळ पीक विम्याच्या लाभासाठी तक्रार निवारण समिती : खासदार रक्षा खडसेंच्या पाठपुराव्याला आले यश
भुसावळ : पुनर्रचित हवामानावर आधारित फळ पिक विमा योजना आंबिया बहार 2022 मध्ये विमा काढल्यानंतरही अनेक शेतकरी लाभापासून वंचित ठरले होते. या शेतकर्यांना लाभ मिळण्यासाठी खासदारांनी पाठपुरावा केल्यानंतर तक्रार निवारण समिती गठीत करण्याचे आदेश राज्याच्या कृषी सचिवांनी काढले आहेत.
पाठपुराव्याला आले यश
फिळ पीक विम्यापासून जिल्ह्यातील अनेक शेतकरी वंचित होते. खासदार रक्षा खडसे यांनी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंग तोमर, केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी व शोभा करंदलाजे यांची कृषी मंत्रालय, दिल्ली येथे भेट होती. तसेच केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलास चौधरी यांच्याकडे पत्रव्यवहार केला होता. वंचित शेतकर्यांना लाभ मिळण्यासाठी तक्रार निवारण समिती गठीत करावी, अशी मागणी खासदारांनी केल्यानंतर कृषी मंत्रालयाकडून
‘तक्रार निवारण समिती’ गठीत करण्याबाबत आदेश पारीत करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी यांच्यामार्फत तक्रार निवारण समिती गठीत झाल्यावर संबधित शेतकर्यांनी तत्काळ संबधित ठिकाणी आपले अर्ज दाखल करावेत, असे आवहान खासदारांनी फळ पीक विम्याच्या प्रलंबित लाभबाबत समस्या असलेल्या केळी उत्पादक शेतकर्यांना केले आहे.







