धनाजी नाना महाविद्यालयाच्या गेट समोर कामबंद आंदोलन


फैजपूर : महाराष्ट्र राज्य शिक्षकेतर कर्मचारी महासंघाच्या वतीने शिक्षकेतर कर्मचार्‍यांच्या विविध मागण्यांसाठी राज्य अध्यक्ष आर.बी.सिंह यांच्या नेतृत्वात 14 डिसेंबर 2023 पासून बेमुदत कामबद आंदोलन करत संप पुकारण्यात आला आहे.

या मागण्यांसाठी आंदोलन
संपात प्रामुख्याने जुनी पेन्शन योजना त्वरीत लागू करावी, पदोन्नतीसाठी 10-20-30 या फॉर्म्युला नुसार कर्मचार्‍यांना त्वरीत पदोन्नती देण्यात यावी, नवीन पदभरती त्वरीत करण्यात यावी अश्या मागण्या करण्यात आल्या आहेत. दरम्यान, धनाजी नाना महाविद्यालयाच्या गेट समोर शिक्षक-शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी कामबंद आंदोलन करण्यात आले. आंदोलनात फैजपूर शहरातील धनाजी नाना महाविद्यालयातील सर्व सर्व शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले. मागण्या लवकरात-लवकर पूर्ण कराव्यात व सर्व कर्मचार्‍यांना न्याय द्यावा, अशी मागणी स्थानिक शाखेचे अध्यक्ष आर.आर.जोगी व उपाध्यक्ष आर.वाय.तायडे यांनी व्यक्त केली. त्यांच्या या मागणीस इतर सर्व संघटनांचा बिनशर्त पाठिंबा मिळत आहे.









मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !