हजारो वर्षानंतरही संतांचे विचार अजरामर : महामंडलेश्वर जनार्दन महाराज


फैजपूर : भगवान दत्तात्रय स्वतः गुरु असताना 24 गुरु केले. पृथ्वी, जल, वायु, आकाश, अग्नी, अजगर, भुंगा, पतंग, मासा, मधमाशी यांच्याकडून गुरुप्रमाणे गुणग्राही बनावे, चांगले घ्यावे म्हणून भगवान दत्तात्रयांनी यांना गुरु केले. गुरु सदेह असताना व देह सोडल्यानंतरही मानव जातीच्या कल्याणासाठी उपयुक्त असतात. संत हजारो वर्षानंतरही त्यांचे विचार सोडून जातात हीच खरी गुरुमहती आहे, असे विचार महामंडलेश्वर जनार्दन महाराज यांनी येथे व्यक्त केले.

शहरातील त्रिमूर्ती चौकातील टाकी वाड्यामध्ये गुरुवर्य संत श्री जगन्नाथ महाराज यांच्या बाविसाव्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. जनार्दन महाराज म्हणाले की, गुरु शिवाय भगवंताची प्राप्ती होत नाही. प.पू.प्रेमदास बापू, महंत पवनदास महाराज, भाजपा जिल्हाध्यक्ष अमोल जावळे, नरेंद्र नारखेडे, फैजपूर एपीआय निलेश वाघ, सावद्याचे एपीआय जालिंदर पळे, श्रीकांत रत्नपारखी यांच्यासह शेकडो भाविक भक्त उपस्थित होते. यावेळी सतपंथ दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले.







धर्मकार्य करणार्‍यांच्या पाठीशी सतपंथ परिवार
काही दिवसांपूर्वी अपघातात जखमी होऊन मृत्यू पावलेले स्वर्गीय नंदू जोशीच्या ब्राह्मण कुटुंबाला राजेश्वरी व ज्ञानेश्वरी श्रीकांत रत्नपारखी, जळगाव यांनी आपल्या बासरी वादनातून मिळालेली अकरा हजारांची रक्कम तसेच सतपंथ चॅरिटेबल ट्रस्टतर्फे अकरा हजारांची मदत म्हणून महामंडलेश्वर जनार्दन हरिजी महाराज यांच्याहस्ते देण्यात आली. यावेळी महाराजांनी सांगितले की, धर्मकार्य, समाजकार्य करणार्‍यांच्या पाठीशी सतपंथ परिवार निरंतर असेल. उपस्थित सर्व भाविक भक्तांनी स्वागत करून टाळ्यांचा प्रतिसाद दिला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !