प्रशिक्षणात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी मनापासून करा : डॉ.संगीता बियाणी


भुसावळ : भविष्यवेधी शिक्षण ही काळाची गरज आहे, मुलाला शिकवण्यापेक्षा ते स्वतः शिकले पाहिजे यामुळे त्याचे ज्ञानार्जन चांगले होते. शिक्षकांनी आता वर्गात शिकवण्यापेक्षा नेतृत्व व्यवस्थापन व नियोजन केले पाहिजे. प्रशिक्षणात घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग विद्यार्थ्यांसाठी मनापासून करा, असे प्रतिपादन बियाणी एज्युकेशन ग्रुपच्या सचिव डॉ.संगीता बियाणी यांनी येथे केले. अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन व सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन प्रशिक्षणाच्या पाच दिवशीय समारोपप्रसंगी बियाणी मिलिटरी स्कूल या ठिकाणी शिक्षकांना आवाहन केले.

तीन टप्प्यात प्रशिक्षण
भुसावळ तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळांचे 150 शिक्षक, शिक्षिका प्रशिक्षण शिबिरात सहभागी झाले. तीन टप्प्यात आयोजित केलेल्या या प्रशिक्षणाचा पहिला टप्पा 12 ते 16 डिसेंबरदरम्यान झाला. या शिबिराचा समारोप प्रसंगी संगीता बियाणी बोलत होत्या. आपले अनुकरण विद्यार्थी करतात शिवाय शिक्षकांमध्ये आत्मविश्वास असला पाहिजे. विद्यार्थी अध्ययनात मागे पडले, तर त्यांच्यासाठी या शिकलेल्या बाबींचा उपयोग केल्यास नक्कीच मूल शिकू शकते, असेही बियाणी म्हणाल्या.


यांची व्यासपीठावर उपस्थिती
अध्यक्षस्थानी बियाणी एज्युकेशन ग्रुपचे अध्यक्ष मनोज बियाणी होते. बियाणी एज्युकेशन ग्रुप शैक्षणिक उपक्रमांना नेहमीच सहकार्य करीत असतो व करीत राहील, असे सांगून प्रशिक्षणातील मिळालेल्या नवीन माहितीचा उपयोग विद्यार्थी हितासाठी करावा, असे मनोज बियाणी म्हणाले. व्यासपीठावर गटशिक्षणाधिकारी किशोर वायकोळे, प्राचार्य डी.एम.पाटील, सुलभक एस.एस.अहिरे, राज्य विज्ञान परीषदेचे सुनील वानखेडे, नितीन भालेराव, कैलास पाटील, निलेश पाटील, अशोक तायडे, गुणवंत पाटील, राहुल भारंबे, अशपाक खान यांनी पाच दिवस या प्रशिक्षणामध्ये मार्गदर्शन केले.

प्रशिक्षण यशस्वीतेसाठी शिक्षण विस्ताराधिकारी तुषार प्रधान, बी.डी.धाडी, विषयतज्ञ सचिन पाटील, संजय गायकवाड, केंद्रप्रमुख आशिक हुसेन, निलेश लोखंडे, राज्य शिक्षक परीषदेचे जिल्हाध्यक्ष गिरीश एस.नेमाडे यांनी परीश्रम घेतले. सूत्रसंचालन अमित चौधरी यांनी तर आभार प्रदीप साखरे यांनी मानले.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !