बेलव्हायच्या विवाहितेचा दुचाकीवरून पडल्याने नशिराबादनजीक अपघाती मृत्यू


Accidental death of married woman of Belvhai near Nashirabad after falling from bike भुसावळ : मोबाईल नादुरुस्त झाल्याने दुरुस्तीसाठी नशिराबाद येथे गेलेल्या विवाहितेच्या परतीच्या प्रवासात दुचाकीवरून पडल्याने मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता घडत्तली. याप्रकरणी नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. शिल्पा उमाकांत खाचणे (30, बेलव्हाय, ता.भुसावळ) असे मयत विवाहितेचे नाव आहे. या घटनेने बेलव्हाय गावात हळहळ व्यक्त करण्यात आली.

खड्ड्यांनी घेतला विवाहितेला बळी
विवाहिता शिल्पा उमाकांत खाचणे या पती उमाकांत मोतीराम खासणे यांच्यासह बेलव्हायला वास्तव्याला होत्या. जळगाव एमआयडीसीतील कंपनीत दोघे पती-पत्नी काम करून उदरनिर्वाह करत होते. मोबाईलची बॅटरी खराब झाल्यामुळे दाम्पत्य मंगळवार, 19 डिसेंबर रोजी सायंकाळी नशिराबाद येथे आले होते. मोबाईल दुरुस्ती करून पुन्हा बेलव्हाय येथे जाण्यासाठी सायंकाळी 7.30 वाजता दुचाकीने निघाले. दरम्यान सिमेंटचा रस्ता असल्याकारणामुळे आलेल्या खड्ड्यामुळे दुचाकीवरील ताबा सुटला व महिला शिल्पा खाचणे ह्या जमिनीवर पडल्या. त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी अंती त्यांना मयत घोषित केले.



दरम्यान विवाहितेच्या अचानक झालेल्या मृत्यूमुळे बेलव्हाय गावात हळहळ व्यक्त करण्यात आली. त्यांच्या पश्चात पती उमाकांत खाचणे आणि दहा वर्षाचा मुलगा असा परिवार आहे. या घटनेबाबत नशिराबाद पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !