धुळ्यातील अल्पवयीन तरुणीला पळवून नेत अत्याचार : व्हिडिओही बनवला
Kidnapping and abducting a minor girl from Dhule : video was also made धुळे : धुळे शहरातील एका अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत अत्याचार करीत अश्लील व्हिडीओ बनवून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही संतापजनक घटना 11 जुलै 2022 ते सप्टेंबर 2023 या दरम्यान घडली. याप्रकरणी पीडित मुलीच्या फिर्यादीवरून शनिवारी चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात 11 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अत्याचार करीत बनवला व्हिडिओ
धुळे शहरातील एका भागातील अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेण्यात आले होते. तिच्यावर अत्याचार करत घरात डांबून ठेवण्यात आले होते तसेच अश्लील व्हिडीओ बनवून मारहाण करण्यात आली. हा प्रकार धुळ्यासह सुरत येथे घडला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुलगी धुळ्यातील आपल्या घरी निघून आली. तिने चाळीसगाव रोड पोलिस ठाण्यात शनिवारी फिर्याद दिल्यानंतर 11 जणांविरोधात बाललैंगिक अत्याचार, बाल विवाहसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस उपनिरीक्षक व्ही. पी. पवार करीत आहेत.





