धुळे जिल्ह्यात मद्यपींची पोलिसांनी उतरवली झिंग
Drunkards arrested by police in Dhule district धुळे : सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करताना ड्रंक अॅण्ड ड्राईव्ह करणार्या मद्यपींची धुळे जिल्हा पोलिस प्रशासनाने कारवाई करीत झिंग उतरवली. धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या नेतृत्वात धुळे जिल्ह्यात पोलिस प्रशासनाकडून धडक कारवाई करण्यात आली.
अशी झाली कारवाई
धुळे जिल्ह्यात 33 ठिकाणी नाकाबंदी लावण्यात आली. त्यात 91 मद्यपींवर कारवाई करीत 50 हजारांचा दंड वसुल करण्यात आला तर शिरपूर शहरात दोन पिस्टल्स व पाच जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. 99 दारूबंदीच्या केसेस करण्यात आल्या व त्या माध्यमातून एक लाख 61 हजार 325 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. 19 जुगार्यांवर कारवाई केल्यानंतर 11 हजार 70 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.





