धुळे जिल्ह्यातील तीन बोगस डॉक्टरांना पोलिसांनी दिले कारवाईचे इंजेक्शन


Three bogus doctors in Dhule district have been given an injection of action by the police धुळे : धुळे जिल्हा पोलिस दलाने बोगस डॉक्टरांविरोधात मोहिम उघडली असून तीन दिवसांपूर्वी सात बोगस डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल झाल्यानंतर नव्याने तीन डॉक्टरांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुन्नाभाई डॉक्टरांकडून वैद्यकीय व्यवसायाची परवानगी नसताना खुलेआमपणे दवाखाने थाटण्यात आल्यानंतर कारवाईचा धडाका सुरू असल्याने बोगस डॉक्टरांच्या वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

यांच्याविरोधात दाखल झाले गुन्हे
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा तालुक्यातील शेवाडे गावातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये सुहास अर्जुन वाघ (43, कोठारी पार्क, दोंडाईचा), साक्री तालुक्यातील टिटाणे येथे राजू नित्यो मलिक (भातगंगा, ता.राणाघाट, जि.नदीया पश्चिम बंगाल, ह.मु.टिटाणी, निजामपूर) तसेच धुळे जिल्ह्यातील नरव्हाळ गावाच्या शिवारात भवानी टेकडीजवळील वस्तीत अमोल रवींद्र सूर्यवंशी (36, नरव्हाळ) यांनी वैद्यकीय व्यवसायाचा कुठलाही परवाना नसताना त्यांच्याकडून वैद्यकीय व्यवसाय सुरू असल्याचे आढळल्याने त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला शिवाय या मुन्नाभाई डॉक्टरांकडून मोठ्या प्रमाणावर इंजेक्शन, सलाईन व गोळ्यांचा साठा जप्त करण्यात आला. धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !