धुळ्यात जुगाराचा डाव उधळला : सहा जुगारी कारवाईच्या कोठडीत

53 हजारांची रोकड जप्त : चाळीसगाव रोड पोलिसात गुन्हा दाखल


Gambling scheme busted in Dhula : Six gamblers in custody for action धुळे : रंगात आलेल्या जुगाराच्या डावावर चाळीसगाव रोड पोलिसांनी छापा टाकत सहा जुगार्‍यांना ताब्यात घेतले. पवन नगरातील महादेव मंदिराजवळील पडक्या घरात रविवार, 7 रोजी रात्री 11.30 वाजता ही कारवाई करण्यात आली. संशयितांकडून 53 हजार 300 रुपयांची रोकड, मोबाईल व जुगाराची साधने जप्त करण्यात आली. चाळीसगाव रोड पोलिसात संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. संशयित 52 पत्ती कॅटवर झन्ना-मन्ना नावाचा जुगार खेळत असताना ही कारवाई करण्यात आली.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलिस अधीक्षक किशोर काळे, सहाय्यक अधीक्षक एस.ऋषीकेश रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक धीरज महाजन, विनोद पवार, पाटील, सुनील पाथरवट, निलेश देवरे, स्वप्नील सोनवणे, चालक योगेश पाटील यांच्या पथकाने केली.








मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !