राष्ट्रीय महामार्गावर वाहनधारकांकडून बेकायदा वसुली : चौघै पोलिस कर्मचारी नियंत्रण कक्षात

धुळे पोलिस अधीक्षकांचे खाजगी वाहनातून ‘स्टिंग’ : कारवाईने पोलिस दलात खळबळ


Illegal recovery from motorists on national highway : Four police personnel in control room धुळे : राष्ट्रीय महामार्गावर अवैधरीत्या वाहनधारकांकडून वसुली करणार्‍या चार कर्मचार्‍यांना धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी तडकाफडकी नियंत्रण कक्षात जमा केल्याने पोलिस वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे वाहनधारकांकडून अवैधरीत्या वसुलीच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर पोलिस अधीक्षकांनी स्वतः खाजगी वाहनातून स्टींग करीत सोमवारी रात्री ही कारवाई केली.

खाजगी वाहनातून पोलिस अधीक्षकांचे ‘स्टींग’
धुळे पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांच्याकडे खाजगी वाहन धारकांनी अवैधरीत्या वसुलीबाबत तक्रारी केल्या होत्या. या अनुषंगाने पोलिस अधीक्षकांनी खाजगी वाहनाद्वारे सोनगीर व धुळे तालुका हद्दीत पाहणी केली असता चार कर्मचारी अवैधरीत्या वसुली करताना आढळल्याने त्यांच्यावर तत्काळ कारवाई करण्यात आली तर संबंधित पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकार्‍यांना याबाबत खुलासा मागवण्यात आला. सोनगीर पोलिस ठाण्याचे चालक तथा उपनिरीक्षक प्रमोद मधुकर ठाकरे यांना मोटार परीवहन विभागात तर सोनगीरचे शिपाई सिराज सलीम खाटीक यांना नियंत्रण कक्षात तसेच धुळे तालुक्याचे दीपक गुलाबराव पाटील यांना नियंत्रण कक्षात जमा करण्यात आले. चालक वसंत नरहर वाघ यांना मोटार परीवहन विभागात नेमणुकीचे आदेशही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिले आहेत. ठाकरे व वाघ यांचा यापुढे जनतेशी संबंध येईल, असे कर्तव्य त्यांना देण्यात येवू नये, असेही आदेशात पोलिस अधीक्षकांनी बजावले आहे.






पोलिस अधीक्षकांच्या कारवाईचा अधिकारी, कर्मचार्‍यांना धसका
धुळ्याचे पोलिस अधीक्षक शिस्तप्रिय म्हणून ओळखले जातात. आल्या आल्या त्यांनी अवैध धंद्यांवर कारवाई सत्र अवलंबले तसेच खात्यातील मुजोर अधिकार्‍यांवर त्यांनी बदलीअस्त्र उगारले. त्यानंतर सरप्राईज व्हिजीट देत कर्मचार्‍यांची हजेरीदेखील तपासली व त्यातील दोषींचे तत्काळ निलंबन केले व आता स्वतः ‘स्टींग’ करीत अवैध वसुली करणार्‍या कर्मचार्‍यांवर कारवाईदेखील केल्याने पोलिस दलात प्रचंड खळबळ उडाली आहे. यापुढे सरप्राईज पद्धत्तीने व्हिजीट केली जाईल व कर्तव्य सोडून इतर उद्योग कर्मचारी वा अधिकारी करीत असल्यास त्यांच्यावर कारवाई करू, असेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !