तळवेल गावातून चोरट्यांनी दुचाकी लांबवली
The thieves stole the bike from Talvel village भुसावळ : भुसावळ तालुक्यातील तळवेल येथील घरासमोरून चोरट्यांनी 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी लांबवली. ही घटना 2 ते 3 जानेवारीदरम्यान घडली. याप्रकरणी वरगणाव पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
गोरीलाल गुलाब पावरे (45, जि.प.मराठी शाळेजवळ, तळवेल) यांच्या तक्रारीनुसार ते मिस्त्री काम करतात व कामावर जाण्यासाठी त्यांच्याकडे दुचाकी आहे. 30 हजार रुपये किंमतीची दुचाकी (एम.एच.19 डी.एन.1722) ही घराबाहेर लावली असताना 2 ते 3 जानेवारीदरम्यान चोरट्यांनी संधी साधून दुचाकी लांबवली. पावरे यांच्या तक्रारीनुसार वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार प्रमोद कंखरे करीत आहेत.


