चोपडा तालुक्यातील अल्पवयीन बालिकेचे शोषण : वयोवृद्धाविरोधात गुन्हा
Exploitation of minor girl in Chopra taluka : Crime against elder चोपडा : चोपडा तालुक्यातील अवघ्या दोन वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी संशयित लोटन पाटील (56) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यास अटक करण्यात आली.
मंगळवार, 9 जानेवारी रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास लोटन पाटील याने अवघ्या दोन वर्षीय मुलीचे लैंगिक शोषण केले. याप्रकरणी पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी संशयित आरोपीला तत्काळ अटक केली आहे. याप्रकरणी पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ.कुणाल सोनवणे हे करीत आहेत.


