चाळीसगावात ड्रायफ्रुटचे दुकान फोडले : रोकडसह सव्वादोन लाखांचा मुद्देमाल लांबवला
A dry fruit shop was broken into in Chalisgaon : goods worth two and a half lakhs along with cash were recovered चाळीसगाव : शहरातील खरजई नाक्याजवळील ड्रायफ्रुटच्या दुकानाला चोरट्यांनी टार्गेट करीत रोकडसह ड्रायफू्रट मिळून दोन लाख 36 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. हा प्रकार 9 ते 10 जानेवारीदरम्यान घडला. याप्रकरणी चाळीसगाव शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
मध्यरात्री केली चोरी
खरजई रोडवर हिरालाल निंबा चौधरी (25, गणेश कॉलनी, चाळीसगाव) हे वास्तव्यास असून खालच्या मजल्यावर न्यू श्री काजू उद्योक नामक होलसेल ड्रायफ्रूट विक्रीचे दुकान आहे. 9 रोजी रात्री 9.30 ते 10 रोजी पहाटे पाचदरम्यान चोरट्यांनी केव्हातरी संधी साधत दुकान फोडून दुकानातील ड्रायफ्रूट व रोकडसह दोन लाख 36 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल लांबवला. गुरुवारी सकाळी दुकानात चोरी झाल्याचा प्रकार लक्षात आल्यानंतर चौधरी यांनी चाळीसगाव शहर पोलिसांना सूचित केले. पोलिस उपअधीक्षक अभयसिंग देशमुख, पोलिस निरीक्षक संदीप पाटील व कर्मचार्यांनी पाहणी केली. तपास पोलिस उपनिरीक्षक योगेश माळी करीत आहेत.


