अमळनेरात 12 वर्षीय अल्पवयीन दिव्यांग बालिकेचे लैंगिक शोषण : वयोवृद्धाविरोधात गुन्हा


Sexual abuse of a 12-year-old disabled girl in Amalner : A crime against the elderly अमळनेर : अमळनेर शहरातील एका भागातील एका भागातील 12 वर्षीय दिव्यांग अल्पवयीन बालिकेचे लैंगिक शोषण केल्याचा धक्कादायक प्रकार 22 डिसेंबर रोजी दुपारी 3.30 वाजता घडला. याप्रकरण संशयित हसन खॉ अमीर खा बेलदार (65, अमळनेर) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

संशयितांविरोधात गुन्हा
11 वर्ष व आठ महिने वयाची पिडीता दिव्यांग व मतिमंद असून ती गल्लीत खेळत असताना संशयिताने 22 डिसेंबर रोजी दुपारी साडेतीन वाजता एका रीक्षेत नेत तिच्यावर लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. याप्रकरणी पीडीतेच्या आजोबांनी अमळनेर पोलिसात तक्रार दिल्यावरून पोस्को अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास उपनिरीक्षक भगवान शिरसाठ करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !