धुळे जिल्ह्यात पाच निरीक्षकांसह चार सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या


Transfer of four Assistant Inspectors including five Inspectors in Dhule district धुळे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने धुळे जिल्ह्यातील पाच निरीक्षकंसह चार सहाय्यक निरीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. त्यात अलीकडेच जिल्ह्यात नव्याने हजर झालेल्या दोघा निरीक्षकांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली आहे. आगामी निवडणुका पारदर्शी पद्धत्तीने पार पडाव्यात या दृष्टीने जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीकांत धीवरे यांनी पोलिस दलातील अधिकार्‍यांमध्ये फेरबदल केले आहेत.

  • या अधिकार्‍यांना मिळाले पोलिस ठाणे
  • पोलिस निरीक्षक के.के.पाटील देवपूर पोलिस ठाणे प्रभारी
  • पोलिस निरीक्षक हर्षवर्धन गोविंदराव गवळी देवपूर पश्चिम प्रभारी
  • चाळीसगाव रोडचे पोलिस निरीक्षक धीरज प्रकाश महाजन यांची धुळे शहर प्रभारी
  • दोंडाईचा पोलिस निरीक्षक श्रीराम मोठाभाऊ पवार शिरपूर तालुका प्रभारी
  • शिरपूर शहरचे पोलिस निरीक्षक अन्साराम सटवाजी आगरकर यांची एसडीपीओ शिरपूर उपविभागात कार्यालयीन कामकाजासाठी
  • पिंपळनेरचे सहाय्यक निरीक्षक श्रीकृष्ण बापू पारधी धुळे गुन्हे शाखेत
  • नियंत्रण कक्षाचे सहाय्यक निरीक्षक जयेश खलाणे यांची पिंपळनेर पोलिस ठाण्यात
  • आझादनगरचे सहाय्यक निरीक्षक संदीप भगवान पाटील शिरपूर शहर पोलिस ठाण्यात
  • शिरपूर तालुका प्रभारी सुरेश शिरसाठ यांची दोंडाईचा प्रभारी


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !