घरी कुणीही नसताना मनवेल गावातील तरुणीने उचलले टोकाचे पाऊल
When there was no one at home, the young woman of Manvel village took an extreme step यावल : सावल तालुक्यातील मनवेल गावातील 25 वर्षीय तरुणीने आपल्या राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. हा प्रकार निदर्शनास येताच तिला तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
मनवेल गावात हळहळ
मनवेल, ता.यावल येथील रहिवासी पुष्पा जितेंद्र कोळी (25) ही तरुणी सोमवारी आपल्या घरी असताना सायंकाळी तिने घरातील लाकडी दांडीला ओढणीने बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार कुटुंबाच्या निदर्शनास येताच तातडीने यावल पोलिसांना माहिती देण्यात आली व तरुणीस यावल ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. या ठिकाणी डॉ. प्रशांत जावळे यांनी तपासणी करून तिला मृत घोषित केले. याप्रकरणी यावल पोलिस ठाण्यात देविदास कोळी यांनी दिलेल्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.


