रावेरच्या केळी व्यावसायीकाला 12 लाखांचा गंडा


12 lakhs to the banana trader of Raver रावेर : उधारीवर केळी माल नेत नंतर रक्कम देण्यास टाळाटाळ करणार्‍या राजस्थानच्या व्यापार्‍याविरोधात रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

असे आहे फसवणूक प्रकरण
सुरेशकुमार गमनोमल रत्नानी (66, छोरीया मार्केट, रावेर) यांच्या तक्रारीनुसार, संशयित श्यामसुंदर शर्मा (कैथरी फू्रट प्रा.लि.ढोलपूर, राजस्थान) यांना सन 2014 ते 2017 दरम्यान वेळोवेळी केळी माल उधार देण्यात आला मात्र त्यांनी तब्बल 12 लाख 28 हजार 316 रुपये थकवून शेतकर्‍याची फसवणूक केली. फसवणूक झाल्याची खात्री झाल्यानंतर रत्नानी यांनी तक्रार दाखल केली. तपास उपनिरीक्षक सचिन नवले करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !