यावल शहरातील जिओच्या मोबाईल टॉवरमधील 84 हजारांचे साहित्य लांबवले
84 thousand materials in Jio’s mobile tower in Yaval city were delayed यावल : यावल शहरात असलेल्या जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरमधून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 84 हजार रुपये किंमतीचे साहित्य चोरट्यांनी लांबवले. याप्रकरणी यावल पोलिसात अज्ञात चोरट्यांविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
सेवा विस्कळीत होताच उघड झाला चोरीचा प्रकार
यावल शहरात चोपडा रस्त्यावर आणि भुसावळ रस्त्यावर जिओचे मोबाईल टॉवर आहे. या टॉवरमधून सुरू असलेली मोबाईल सेवा विस्कळीत झाल्यानंतर जिओ कंम्पनीचे पर्यवेक्षक मुरलीधर रघुनाथ माळी यांनी तेथे जाऊन पाहणी केली असता या टॉवरमध्ये लावलेले विविध इलेट्रीकल्स साहित्य चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. बुधवारी यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध 84 हजार रुपये किमतीचे साहित्य चोरी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलिस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळ, हवालदार राजेंद्र पवार करीत आहे.


