हुंड्यासाठी पत्नीचा छळ करीत तलाख : चिनावलच्या आरोपीला दोन वर्ष शिक्षा


Divorce by torturing wife for dowry : Chinaval accused gets two years sentence रावेर : गुरांचा व्यापार करण्यासाठी पत्नीने माहेरून 50 हजार रुपये न आणल्याने पत्नीला तलाख देण्यात आला होता. याप्रकरणी आरोपी पतीस दोन वर्ष कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा रावेर न्यायालयाचे न्या.अनंत बाजड यांनी गुरुवारी सुनावली. शेख हसन शेख सत्तार (30, रा.चिनावल, ता.रावेर) असे शिक्षा सुनावलेल्या आरोपीचे नाव आहे.

असे आहे प्रकरण
गुरांचा व्यापार करण्यासाठी पत्नीने माहेराहून 50 हजार रुपये हुंडा म्हणून आणावा यासाठी हसन हा पत्नीचा शारीरिक व मानसिक छळ करीत मारहाण करीत होता शिवाय जीवे मारण्याची धमकी देत त्याने तीन वेळा तलाक म्हणून बेकायदेशीर घटस्फोट दिला. या प्रकाराबाबत हसनची पत्नी तबस्सुम नाज हिने सावदा पोलिसांत फिर्याद नोंदवली. त्यावरून मुस्लीम महिल संरक्षण कायद्यान्वये गुन्हा दाख करण्यात आला होता.



दोन वर्ष शिक्षा व 25 हजार रुपये दंड
या खटल्यात सात जणांची साथ नोंदविण्यात आली. साक्षीदार, पंच तपासाधिकार्‍यांची साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. त्यानंतर न्या.अनंत बाज यांनी शेख हसन यास दोन व कारावास व 25 हजार रुपये दंडाची शिक्षा, तथा दंड न भरल्यास सहा महिने साधी कैदेची शिक्षा सुनावली. या गुन्ह्याचा तपास सावद्याचे तत्कालीन सहाय्यक निरीक्षक राहुल वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक सुरेश अढायके यांनी केला. सरकार पक्षातर्फे अ‍ॅड.एन.डी.तायडे व अ‍ॅड.श्रीकृष्ण दुट्टे यांनी काम पाहिले. पैरवी म्हणून पोलिस कॉन्स्टेबल संजय बावस्क यांनी काम पाहिले.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !