शिरपूरात साधूच्या वेशातील भामट्याने तीन लाखांचा ऐवज लांबवला
In Shirpur, an impostor disguised as a monk stole a reward of three lakhs शिरपूर : साधूच्या वेशात आलेल्या भामट्याने शिरपूर वृद्धाकडील तीन लाखांचा ऐवज लांबवला. ही घटना गुरुवारी सायंकाळी घडली. शिरपूर शहर पोलिसात रात्री गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. रोहिदास वामन पाटील (82, रा. प्लॉट नंबर 48 ब, संदीपन कॉलनी, निमझरी रोड, शिरपूर) यांनी याबाबत गुन्हा दाखल केला.
असे आहे फसवणूक प्रकरण
रोहिदास पाटील हे गुरुवारी दुपारी 4 ते सव्वाचारच्या सुमारास घरासमोरील दुभाजकावर बसलेले होते. यावेळी नागासाधूसह संशयति आल्यानंतर त्यांनी बोलण्यात गुंतवत संमोहन केले. वृद्धाकडील एक लाख 21 हजार 800 रुपये किंमतीच्या दोन सोन्याच्या अंगठ्या, एक लाख 82 हजार 700 रुपये किंमतीची सोन्याची चेन असा एकूण तीन लाख 4 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज त्यांच्याकडे देण्यास भाग पाडले. त्यानंतर दोघांनी घटनास्थळावरुन गाडीसह पोबारा केल. संमोहनातून बाहेर पडल्यानंतर आपण लुटले गेलो आहोत, अशी कल्पना येताच रोहिदास पाटील यांनी शिरपूर शहर पोलिस ठाणे गाठले.





