करंजी येथे तलवार बाळगणार्‍या दोघांविरोधात गुन्हा


Crime against two carrying swords in Karanji भुसावळ : बोदवड तालुक्यातील करंजी येथे दहशत निर्माण करणार्‍या दोघांविरोधात वरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

गणेश सुरेश पाटील (26) व नंदूलाल पंढरी पाटील (25) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयितांची नावे आहेत. याप्रकरणी प्रशांत ठाकूर यांनी फिर्याद दिली. संशयित गणेश पाटील याने जनावरांच्या गोठ्यात तलवार लपवल्याची माहिती मिळाल्यानंतर 27 रोजी दुपारी अडीच वाजता सहाय्यक पोलिस निरीक्षक भरत चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !