दोघांवर विळ्याने प्राणघातक हल्ला : रावेर तालुक्यातील घटना
Attack on two with sickle : incident in Raver taluka जळगाव : 27 वर्षीय विवाहितेने दोघांवर विळ्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना रावेर तालुक्यातील बार्हेडा, ता.रावेर गावात 28 रोजी दुपारी 12.30 वाजता घडली. याप्रकरणी 27 वर्षीय विवाहितेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
अचानक केला हल्ला
रावेर तालुक्यील बार्हेडा येथे तक्रारदार जितेंद्र एकनाथ पाटील व त्यांचा मित्र अरुण पाटील असे दोघे जण मराठी शाळेच्या मैदानावर बोलत उभे असताना जुन्या वादातून 27 वर्षीय महिलेने डोक्याच्या मागील बाजूने तसेच डाव्या हाताच्या मनगटावर वार केला तर हा प्रकार पाहून जितेंद्र पाटील यांच्या वहिनी सुनीता पाटील या वाद सोडवण्यासाठी आली असता संशयित आरोपी असलेल्या विवाहितेने त्यांच्या उजव्या हातावरदेखील विळ्याने दुखापत केली. तपास सहायक पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक शाम तांबे करीत आहेत.


