12 हजारांची लाच भोवली : शिंदखेडा तालुक्यातील मुख्याध्यापकासह कार्यालय अधीक्षक धुळे एसीबीच्या जाळ्यात


12,000 bribe : Principal and office superintendent of Shindkheda taluka caught in ACB’s net धुळे : भाजीपाला पुरवठ्याचे देयक काढून देण्याच्या मोबदल्यात तडजोडीअंती 12 हजारांची लाच मागून ती स्वीकारताना शिंदखेडा तालुक्यातील म्हळसर आळमशाळेच्या मुख्याध्यापकासह कार्यालयीन अधीक्षकाला धुळे एसीबीने लाच स्वीकारताच अटक केली. प्रदीप कुमार वामनराव राठोड (34, (विद्या कॉलनी, स्वामीनारायण मंदिरा मागे दोंडाईचा) असे अटकेतील मुख्याध्यापकाचे तर हनुक फुलसिंग भादले (47, रा.साईबाबा अपार्टमेंट, मांडळ शिवार, शिरपूर) असे कार्यालयीन अधीक्षकाचे नाव आहे.

असे आहे लाच प्रकरण
32 वर्षीय तक्रारदार यांच्या पत्नी महिला आदिवासी बचत गटाच्या सचिव आहेत. त्यांच्या बचत गटाने शासकीय प्राथमिक आश्रम शाळा म्हळसर, कॅम्प सुलवाडे, ता.शिंदखेडा, जि.धुळे येथे शालेय पोषण आहाराकरीता भाजीपाला पुरवठा करण्याचे कंत्राट घेतले आहे. तक्रारदार हे त्यांच्या पत्नीस मदत करतात. महिला बचत गटास वरील आश्रम शाळेकडून भाजीपाला पुरवठ्याचे मागील 9 महिन्याचे देयक मंजूर करून देण्यात आल्याने . त्याचा मोबदला म्हणून तसेच उर्वरित दोन महिन्यांचे पुढील देयक अदा करण्यास मदत करण्यासाठी मुख्याध्यापकाने कार्यालयीन अधीक्षकांच्या माध्यमातून 20 हजारांची लाच मागितली व 12 हजार रुपये देण्याचे ठरले.






लाच स्वीकारताच अटक
कार्यालयीन अधीक्षकाने लाच स्वीकारताच त्यांना अटक करण्यात आली व नंतर मुख्याध्यापकालाही अटक करण्यात आली.

यांनी केला सापळा यशस्वी
धुळे एसीबीचे पोलिस अधीक्षक अभिषेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक हेमंत बेंडाळे, पोलिस निरीक्षक रुपाली खांडवी, हवालदार राजन कदम, मुकेश अहिरे, प्रवीण मोरे, संतोष पावरा, रामदास बारेला, प्रशांत बागुल, मकरंद पाटील, प्रवीण पाटील, चालक सुधीर मोरे, जगदीश बडगुजर आदींनी हा सापळा यशस्वी केला.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !