क्रेडीट कार्ड अ‍ॅक्टीव्ह करण्याच्या बहाण्याने निंभोर्‍यातील तरुणाला एक लाखांचा गंडा


A youth from Nimbhora extorted Rs 1 lakh on the pretext of activating a credit card भुसावळ  : इंण्डस लॅण्ड बँकेचे के्रडीट कार्ड अ‍ॅक्टीव्ह करण्याची लिंक पाठवून नोकरदार तरुणाच्या खात्यातून तब्बल 97 हजार 898 रुपये वळते करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार निंभोरा, ता.भुसावळ येथे 13 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता घडला. याप्रकरणी अज्ञाताविरोधात भुसावळ तालुका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला.

ऑनलाईन भामट्यांपासून सतर्कतेची गरज
पवन कुमार पंडित पाटील (37, निंभोरा बु.॥, ता.भुसावळ) हे कम्प्लायन्स ब्रॉड बॅण्ड प्रा.लि.कंपनीत नोकरी करतात. 13 जानेवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता ते घरी असताना 917534012731 क्रमांकावरून कॉल करीत इंण्डस लॅण्ड बँकेचे के्रडीट कार्ड अ‍ॅक्टीव्ह करण्यासाठी लिंक पाठवत असल्याचे सांगून तिला क्लीक करण्याचे सांगितले. तक्रारदाराने लिंक ओपन करताच त्यांच्या बँक खात्यातून 97 हजार 898 रुपये वळते करण्यात आले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने भुसावळ तालुका पोलिस ठाणे गाठत तक्रार नोंदवली. तपास सहाय्यक निरीक्षक अमोल पवार करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !