एमआयडीसी पोलिसांची मोठी कामगिरी : पाच दुचाकी चोरणार्‍या दोंडाईचातील भामट्याला बेड्या


MIDC Police’s big achievement: Five bike-stealing duos arrested जळगाव : एमआयडीसी पोलिसांनी चोरीच्या पाच दुचाकींसह दोंडाईचा (जि.धुळे) येथील फैय्याज शकुर मनीयार (रा. सुप्रिम कॉलनी जळगाव) याला शुक्रवारी अटक केली आहे. गेल्या तीन महिन्यापासून संशयित येथील सुप्रिम कॉलनीत वास्तव्याला होता. या तरुणाकडे चोरीच्या मोटारसायकली असल्याची गोपनीय माहिती पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली. त्यानुसार एमआयडीसीचे गुन्हे पथक नियुक्त करण्यात आले. संशयित सुप्रीम कॉलनीत असल्याची माहिती कळताच फैय्याज मणियार याला अटक करण्यात आली. संशयिताकडून चोरीच्या तब्बल पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या.

जळगावसह दोंडाईचा शहरातून दुचाकींची चोरी
चोरट्यांकडून पॅशन प्रो (क्रमांक एम.एच.19 सी.बी.4029), होंडा अ‍ॅक्टीवा, पॅशन प्रो. (क्रमांक एम.एच.18 टी.9602), ग्लॅमर व सुपर स्प्लेडंर विना क्रमांकाची अशा एक लाख 35 हजार रुपये किंमतीच्या पाच दुचाकी जप्त करण्यात आल्या. यातील दोन दुचाकी या एमआयडीसी व जळगाव शहर पोलीस स्टेशन हद्दीतून तर एक दुचाकी दोंडाईचा येथून लांबवण्यात आल्याचे स्पष्ट झाले.






यांनी केली कारवाई
ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप गावीत, पोलिस निरीक्षक जयपाल हिरे, पोलिस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक दीपक जगदाळे, एएसआय अतुल वंजारी, हवालदार दत्तात्रय बडगुजर, गणेश शिरसाळे, किशोर पाटील, योगेश बारी, विकास सातदिवे, सचिन पाटील, नाना तायडे, ललित नारखेडे, किरण पाटील, महिला अंमलदार राजश्री बाविस्कर यांनी केली. संशयिताला न्यायालयात हजर केले असता तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.



मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !