अंजाळे येथील मोर नदी पूलावर भीषण अपघात : कार चालकाविरुद्ध गुन्हा


Horrific accident on Mor river bridge in Anjale : Crime against car driver यावल : अंजाळे जवळील मोर नदीच्या पुलावर एका कारचालकाने दोन दुचाकींना धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात कार चालकाविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. या अपघातात जखमींची प्रकृती अजूनही चिंताजनक आहे.

जखमींची प्रकृती चिंताजनक
अंजाळे, ता.यावल येथील मोर नदीवरील पुलावर गुरूवारी सायंकाळी कार (क्रमांक एम.एच.19 बी.यु. 3085) वरील चालक श्रीराम सुरेश सोनवणे (रा.यावल) यांनी दोन दुचाकींना धडक दिली होती. या अपघातात अरविंद प्रभाकर पाटील (45, रा.बोरावल खुर्द), पिंटू उर्फ देवेंद्र रामभाऊ शेकोगार व त्यांचा मुलगा सोहम शेकोगार (14, दोघं रा.अंजाळे) हे गंभीर जखमी झाले होते. याप्रकरणी यावल पोलिसात देवेंद्र शेगोकार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कार चालक श्रीराम सोनवणे यांच्याविरुद्ध अपघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !