राईनपाड्यात भिक्षुकांची हत्या : सात नराधम आरोपींना जन्मठेपेची शिक्षा
Killing of Bhikkhus in Rainpada : Seven murder accused sentenced to life imprisonment धुळे : मुले पळवणारी टोळी आल्याचे समजून पाच भिक्षुकांची राईनपाड्यात हत्या करण्यात आली होती. या खटल्याकडे राज्याचे लक्ष लागून असताना सोमवारी या खटल्याचा निकाल लागला. त्यात धुळे सत्र न्यायालयाचे न्यायमूर्ती एत्त.ए.एम. ख्वाजा यांनी सात आरोपींना दोषी ठरवत त्यांना जन्मठेपेची सुनावली. सहा वर्षांनी राईनपाडा हत्याकांडाचा निकाल लागला.
मुले पळवणारी टोळी समजून भिक्षुकांची हत्या
साक्री तालुक्यातील राईनपाडा येथे मुलांना पकडण्यासाठी टोळी आल्याच्या अफवेतून भारत शंकर भोसले, भरत मावळे, दादाराव भोसले, आगनुक इंगोले, राजू भोसले या गोसावी डावरे समाजातील भिक्षुकांची हत्या करण्यात आली होती. हा संतापजनक प्रकार 1 जुलै 2018 रोजी राईनपाडा ग्रामपंचायत कार्यालयात घडला होता.





या आरोपींनी जन्मठेपेची शिक्षा
याप्रकरणी दाखल खटल्याची धुळे न्यायालयात सुनावणी झाली. सोमवारी या हत्याकांडातील आरोपी महारू ओंकार पवार, दशरथ दसन्या पिंपळसे, हिरालाल ढवळ्या गवळी, गुलाब रामा पाडवी, युवराज मणू बौरे, मोतीलाल काशिनाथ साबळे यांना यायमूर्ती एस.ए.एम.ख्वाजा यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी उज्वल निकम, जिल्हा सरकारी वकील अॅड.देवेंद्रसिंह तंवर, सरकारी वकील निलेश कलाल यांनी बाजू मांडली. तपासाधिकारी तत्कालीन डीवायएसपी श्रीकांत घुमरे यांची साक्ष महत्वाची ठरली.
