टाकरखेडा येथील गुरांच्या गोठ्यातून 40 हजार रुपये किंमतीची बैल जोडी चोरी


A pair of bulls worth Rs 40,000 was stolen from a cattle shed in Takarkheda  यावल : यावल  तालुक्यातील टाकरखेडा गावातील गोठ्यातून बांधलेली बैल जोडीची चोरी झाली. गोठ्यात एका ठिकाणी तीन बैल बांधलेले होते. त्यातील 40 हजार रुपये किंमतीची बैल जोडी अज्ञात चोरट्याने चोरी केली. हा प्रकार निदर्शनास आल्यावर यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पशूधन चोरीने खळबळ
टाकरखेडा, ता.यावल या गावातील रहिवासी सुभाष देवकर चौधरी यांनी आपल्या गुरांच्या गोठ्यामध्ये बैल जोडी आणि जनावरे बांधली होती. मध्यरात्रीनंतर कोणीतरी अज्ञात चोरट्याने तीन बांधलेल्या बैलांपैकी एक बैल जोडी चोरी केली. सुभाष चौधरी यांच्या फिर्यादीवरून यावल पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरुद्ध बैल जोडी चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक किशोर परदेशी करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !