भुसावळ शहरातील मुस्लीम कॉलनीत तीन दुचाकी पेटवल्या


Three bikes were set on fire in the Muslim Colony of Bhusawal भुसावळ : शहरातील खडका रोडवरील मुस्लीम कॉलनीत तीन दुचाकी ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून देण्यात आल्याची धक्कादायक घटना मंगळवार, 6 रोजी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात संशयित मुस्ताक शाह बशीर शाह (भुसावळ) विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

एकाविरोधात गुन्हा दाखल
नूरा शाह मोहम्मद शाह (47, न्यू ईदगाहबाहेर, मदीना मशिदीजवळ, भुसावळ) यांच्या तक्रारीनुसार, मंगळवार, 6 रोजी पहाटे सव्वाचार वाजेच्या सुमारास घराबाहेर लावलेली दुचाकी (एम.एच.19 ए.एम.5414), (एम.एच.19 ए.डब्ल्यू.3864) व (एम.एच.19 बी.व्ही.7726) यांच्यावर संशयित मुस्ताक शाह बशीर शाह (भुसावळ) याने ज्वलनशील पदार्थ टाकून पेटवून दिले. या घटनेत तीन्ही दुचाकींचे 32 हजारांचे नुकसान झाले. तपास पोलिस नाईक सोपान पाटील करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !