भुसावळातील गो सेवक पंडित रवीओम शर्मा यांनी उचलले टोकाचे पाऊल
An extreme step was taken by Pandit Raviom Sharma, a cow servant from Bhusawal भुसावळ : भुसावळातील गो सेवक तथा अंजाळेतील नंदग्राम गो शाळेचे व्यवस्थापक रवीओम सुगनचंद शर्मा (57) यांनी 7 फेबु्रवारी रोजी कुठल्यातरी कारणातून विषारी द्रव सेवन केल्याने त्यांच्यावर शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान शुक्रवार, 9 फेब्रुवारी रोजी दुपारी 12.30 वाजता त्यांची प्राणज्योत मालवली.
अज्ञात कारणातून केले विष प्राशन
शहरातील भले गल्ली, इमलीपूरा भागात पं.रवीओम शर्मा हे कुटूंबासह वास्तव्यास होते. गो सेवक म्हणून त्यांची ख्याती होती शिवाय सामाजिक कार्यातही ते आघाडीवर होते व अंजाळे येथील नंदग्राम गो शाळेत व्यवस्थापक म्हणून ते काम सांभाळत होते मात्र 7 रोजी त्यांनी कुठल्यातरी कारणातून राहत्या घरात विषारी द्रव सेवन केल्यानंतर हा प्रकार कुटूंबियांना कळताच त्यांना खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. शर्थीचे उपचार सुरू असताना शुक्रवार, 9 रोजी दुपारी त्यांची प्राणज्योत मालवली.


ग्रामीण रुग्णालयात त्यांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आले. शनिवारी शोकाकुल वातावरणात त्यांच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पं.शर्मा यांच्या पश्चात वडिल, सून, तीन मुले, दोन भाऊ, अविवाहित मुलगी असा परिवार आहे. भुसावळातील कट्टर शिवसैनिक नमा (उमाकांत) शर्मा व रमाकांत शर्मा यांचे ते मोठे बंधू होत.
