भुसावळातील अयोध्या नगरात भर दिवसा धाडसी घरफोडी : अडीच लाखांचा ऐवज लंपास


Daring burglary in Ayodhya town of Bhusawal in broad daylight : 2.5 lakhs looted भुसावळ : शहरात चोर्‍या-घरफोड्यांचे सत्र कायम असून पोलिसांनी गस्त वाढवण्यासह चोरट्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे. शहरातील जळगाव रोडवरील अयोध्या नगर भागात भर दिवसा बंद घर फोडून चोरट्यांनी दोन लाख 59 हजारांचा ऐवज लांबवल्याचा प्रकार 11 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री घडला. याप्रकरणी शहर पोलिसात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

बंद घर चोरट्यांना पर्वणी
उमेश बाळू चिमणकर (प्लॉट नंबर 40, अयोध्या नगर, भुसावळ) हे परीवारासह वास्तव्याला आहेत. चिमणकर कुटूंब बाहेरगावी गेल्याने घर बंद असल्याची संधी चोरट्यांनी साधली. सेप्टी दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी 11 रोजी 3 ते 8 दरम्यान चोरट्यांनी घरात प्रवेश करीत एक लाख दोन हजार रुपये किंमतीचे सोन्याचे तीन तोळे व चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे गंठण, 75 हजार रुपये किंमतीचे दोन तोळे व पाच ग्रॅम वजनाची सोन्याची मंगलपोत, 13 हजार 500 रुपये किंमतीचे साडेचार ग्रॅम वजनाचे कानातले, 15 हजार रुपये किंमतीची पाच ग्रॅम वजनाची अंगठी, नऊ हजार रुपये किंमतीची तीन ग्रॅमची लेडीज अंगठी, 25 हजार रुपये किंमतीचे लॅपटॉप व 20 हजारांची रोकड असा एकूण दोन लाख 59 हजार 500 रुपये किंमतीचा ऐवज लांबवण्यात आला.



पोलिसांची धाव
घरफोडीची माहिती कळताच पोलिस उपअधीक्षक कृष्णात पिंगळे, शहर निरीक्षक संदीप रणदिवे व शहर पोलिसांनी धाव घेत पाहणी केली. जळगाव येथून श्वान पथकासह ठसे तज्ज्ञांना पाचारण करण्यात आले. या भागातील सीसीटीव्ही फुटेज तपासणीसह खबर्‍यांचे नेटवर्क अ‍ॅक्टीवेट करून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे. तपास पोलिस उपनिरीक्षक अंबादास पाथरवट करीत आहेत.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !