यावल पोलिसांच्या पथकाने वाळू चोरी करून नेणारे डंपर पकडले


A team of Yaval police caught the dumpers who were stealing sand यावल : यावल पोलिसांच्या पथकाने रविवारी मध्यरात्रीनंतर दीड वाजता वाळु चोरी करून नेत असतांना डंपर पकडले. ही कारवाई अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावरील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयाजवळ करण्यात आली. याप्रकरणी यावल पोलिसात डंपर मालकाविरुद्ध वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या कारवाईने खळबळ
यावल शहरातून मार्गस्थ होणार्‍या अंकलेश्वर-बर्‍हाणपूर राज्य मार्गावर चोपड्याकडून वाळू चोरी करून डंपर (क्रमांक एम.एच.19 सी. वाय. 9858) हे यावल शहरात येत होते. मध्यरात्रीनंतर दिड वाजेला सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयाजवळ या वाहनाला यावल पोलिसांच्या पथकाने पकडले व वाळु वाहतुकीचा परवाना मागितल्यानंतर चालकाकडे तो नसल्याने वाहन जप्त करण्यात आले. डंपर पोलिसांनी ताब्यात घेत डंपर मालक दीपक ज्ञानेश्वर सोळुंके (कोळन्हावी, ता.यावल) याच्या विरुद्ध यावल पोलिसात हवालदार अनिल पाटील यांच्या फिर्यादीवरून वाळू चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावल पोलिस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस नाईक वसीम तडवी करीत आहे.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !