अट्रावलच्या मुंजोबा यात्रेत आलेल्या भाविकाची मोटारसायकल चोरी
Motorcycle theft of a devotee who had come to Atraval’s Munjoba Yatra यावल : यावल तालुक्यातील अट्रावल येथे मुंजोबाच्या यात्रेसाठी भालोद येथील खेमचंद चौधरी आले असता त्यांची दुचाकी चोरट्यांनी लांबवली. दर्शन घेऊन परत आल्यानंतर दुचाकी चोरीचा प्रकार समोर आला.
यात्रोत्सव ठरतोय चोरट्यांना पर्वणी
यावल पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. अट्रावल, ता.यावल येथे मुंजोबाची यात्रा सुरू आहे. सोमवारी या यात्रेत खेमचंद चौधरी आले होते व त्यांनी रसवंती जवळ त्यांची मोटरसायकल (क्रमांक एम.एच.19 सी.पी. 8998) ही लावली होती आणि ते मुंजोबाच्या दर्शनासाठी मंदिरात गेले होते. दर्शन घेऊन जेव्हा ते परतले तेव्हा जागेवर मोटरसायकल नव्हती. सर्वत्र शोध घेऊन ही मोटरसायकल मिळून न आल्याने यावल पोलिसात अज्ञात चोरट्याविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला. तपास सहायक पोलिस निरीक्षक हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार संदीप सूर्यवंशी, किशोर परदेशी करीत आहे.


