जळगावातील विवाहितेचा छळ : पतीसह सात जणांवर गुन्हा
Harassment of married woman in Jalgaon : Crime against seven persons including husband जळगाव : विवाहितेच्या अंगावरील दागिने काढुन तिला चापटाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली. याप्रकरणी पतीसह सासरे सासु यांच्यासह सासरच्या सात जणांविरुध्द शहर पोलिसात गुन्हा दाखल झाला.
यांच्याविरोधात गुन्हा दाखल
36 वर्षीय विवाहिता दुध फेडरेशन रोड जळगाव येथे वास्तव्यास असून सासर कुर्ला ईस्ट नेहरुनगर मुंबई आहे. 18 जुलै 2023 ते 10 फेब्रुवारी 2024 दरम्यान विवाहिता सासरी असताना संशयित पती, सासू, सासरे यांच्यासह इतर सासरच्या नातेवाईक लोकांनी घरगुती कारणावरुन विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ करण्यास सुरुवात केली. तिच्या अंगावरील चार तोळ्याचे गंठन , 2 तोळ्याचे गंठण (लहान) तसेच पायातील 2 भाराच्या साखळ्या असे श्रीधन सासरी काढुन घेत तिला मारहाण केली. या प्रकरणी सासू आशा निकम, सासरे अशोक निकम, पती राहुल निकम यांच्यासह नणंद, दीर, मोठे सासरे आदींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.


