दहिगावात जुगार अड्ड्यासह अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई : अवैध धंदे चालक हादरले

दोन लाख 30 हजारांचा मुद्देमाल जप्त : सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल


Action against illegal liquor sellers including gambling dens in Dahigaon : Drivers of illegal businesses are shaken यावल : यावल तालुक्यातील दहिगाव येथे फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपुर्णा सिंग यांच्या पथकाने जुगार अड्ड्यावर छापा टाकत अवैधरीत्या दारू विक्री करणार्‍यांवर कारवाई केली. यामध्ये तब्बल दोन लाख 30 हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. ही कारवाई बुधवारी सायंकाळी सात वाजता करण्यात आली. सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईमुळे यावल तालुक्यातील अवैध धंदे चालकांच्या गोटात खळबळ उडाली आहेत.

गोपनीय माहितीवरून कारवाई
दहिगाव ता.यावल या गावात फैजपूर उपविभागीय कार्यालयाच्या सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून त्यांच्या पथकाने बुधवारी सायंकाळी सात वाजता कारवाई केली. यात दहिगाव गावातील यावल रस्त्यावर असलेल्या बालाजी तोल काट्याजवळ जुगार अड्ड्यावर छापा टाककून सात संशयितांना ताब्यात घेण्यात आले व त्यांच्याकडून सहा मोटरसायकल, सहा मोबाईल, रोख रक्कम असा एकूण दोन लाख 10 हजार 490 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. संशयितांविरुद्ध जुगार अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तपास यावलचे सहायक पोलिस निरीक्षक हरीष भोये यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार असलम खान करीत आहे.



अवैध देशी-विदेशी दारू जप्त
सहाय्यक पोलिस अधीक्षक अन्नपूर्णा सिंग यांच्या पथकाने दहिगाव गावात मोरया हॉटेलच्या बाजूला अवैद्य देशी-विदेशी दारू विक्री करणार्‍या संतोष कोळी यांच्यावर कारवाई केली. 19 हजार 900 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. दोन्ही कारवाई दरम्यान एकूण दोन लाख 30 हजार 390 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.


मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !