यावल शहरात दोन दुचाकींची धडक : तिघे गंभीर जखमी
Two bikes collided in Yaval city : Three seriously injured यावल : शहरातील भुसावळ रस्त्यावरील फालक नगर स्टॉपनजीक बुधवारी रात्री आठ वाजेला दोन दुचाकींची समोरासमोर धडक झाली. या अपघातामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचाराकरीता आणण्यात आले येथे. त्यांच्यावर प्रथमोपचार करून पुढील उपचारार्थ जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले.
तिघे गंभीर : जळगावात उपचार
यावल शहराजवळील फालक नगराजवळ बुधवारी रात्री आठ वाजता दोन दुचाकींची आपसात धडक झाली. या अपघातामध्ये प्रदीप कडू लोखंडे (48, राफणार सुतार वाडा, यावल), सज्जा शेख शफी (22) व शेख मोसीन शेख समसोद्दीन (19) हे तीन जण गंभीर जखमी झाले. अपघातानंतर या तिघांना तातडीने यावल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. अपघाताची माहिती मिळताच माजी नगरसेवक मनोहर सोनवणे, समीर खान, काँग्रेसच्या शहराध्यक्ष कदीर खान, उपाध्यक्ष अनिल जंजाळे यांनी रुग्णालयात धाव घेतली रुग्णालयात डॉ.प्रशांत जावळे, डॉ.इरफान खान, अधिपरीचारीका प्रियतमा पाटील, आतीश खडके, प्रवीण बारी यांनी जखमींवर प्रथमोपचार केले. तिघांना जबर दुखापत असल्यामुळे या तिघांना तातडीने जळगाव जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रुग्णालयात हलवण्यात आले या तिघांची प्रकृती गंभीर असून अपघातानंतर रुग्णालयात प्रचंड गर्दी झाली.


