मधापुरी येथे मारहाण करीत परप्रांतीयाला लूटले : पुन्हा टोळ्या सक्रिय
In Madhapuri, a migrant was beaten up and robbed : Gangs are active again मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील मधापुरी परीसरात परप्रांतीयाला बोलावून मारहाण करीत लूटण्यात आले मात्र पोलिसात याप्रकरणी गुन्हा दाखल नसल्याचे सूत्रांनी सांगितले.
मारहाण करीत परप्रांतीयाला लूटले
मुक्ताईनगर तालुक्यात नागमण, मांडूळ साप, काळी हळद, सुलेमानी पत्थर, काईनसह पांढरा बिबा अश्या वेगवेगळ्या वस्तू देण्याच्या बहाण्याने मधापूरी, हलखेडा, लालगोटा, कुर्हा व परीसरात लुटणार्या टोळ्या आजही सक्रिय आहे. अनेकांची फसवणूक झाली असून पोलिसात तसे गुन्हेदेखील दाखल आहेत मात्र टोळ्यांचा उपद्रव आजही कायम आहे. गुरुवार, 15 फेब्रुवारी रोजी हिमाचल प्रदेशातील मंडी येथील अविनाश कुमार या तरुणाला कुर्हा येथे बोलावल्यानंतर दोघा संशयितांनी मधापुरी येथे नेले व नंतर मारहाण करीत त्याच्याकडील एटीएम हिसकावण्यात आले व त्यातून तब्बल 64 हजार रुपये संशयितांनी काढले व धूपेश्वर स्टॉपवर सोडून संशयित पसार झाले. यावेळी परप्रांतीय तरुणांसह संशयितांमध्ये झटापट झाल्यानंतर संशयित दुचाकी सोडून पसार झाले. यावेळी जखमी तरुणाकडे पैसे नसल्याने त्याने पोलिस ठाणे गाठले मात्र तक्रार दिली नसल्याचे सूत्रांनी सांगितले. संबंधिताने तक्रार न दिल्याने भाड्यासाठी त्यास पैसे देवून सोडण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले.


