गोजोरा गावातील खुनामागे समोर आले धक्कादायक कारण : दोघा भावांना अटक


Shocking reason behind Gojora village murder revealed: Two brothers arrested
भुसावळ :
भुसावळ तालुक्यातील गोजोरा येथे 27 वर्षीय तरुणाची अनैतिक संबंधाच्या संशयातून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी दोघा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. ही धक्कादायक घटना शुक्रवार, 16 फेब्रुवारी रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली.

संशयित आरोपींना 22 पर्यंत पोलिस कोठडी
संशयित आरोपींना शनिवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना 22 पर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली. गोजोरा गावातील विनोद गंभीर कोळी (27, रा.गोजोरा, ता.भुसावळ) या तरुणाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून त्यास दत्तात्रय भोजू तळेले यांच्या शेतात नेवून मारहाण करण्यात आली होती व या घटनेत तरुणाचा मृत्यू ओढवला होता. याप्रकरणी प्रमोद गंभीर कोळी (30, गोजोरा) यांच्या फिर्यादीवरून समाधान उर्फ रामलाल प्रभाकर दोडे उर्फ कोळी व जितू प्रभाकर दोडे उर्फ कोळी यांच्याविरोधात खुनाचा गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. तपास पोलिस निरीक्षक बबन जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक पूजा अंधारे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !