इलेक्ट्रीक शॉक लागल्याने अंतुर्लीतील तरुणाचा मृत्यू


Anturli youth dies due to electric shock मुक्ताईनगर : मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथील तरुणाचा शेतात गेल्यानंतर इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू झाला. ही घटना शनिवार, 17 रोजी सकाळी 9 वाजता उघडकीस आली. अरुण भीमराव पाटील असे मयताचे नाव आहे.

शेतात इलेक्ट्रीक शॉक लागल्याने मृत्यू
अरुण हा भामदरा भागातील शेतात गेल्यानंतर बराच वेळ होवूनही परत न आल्यामुळे त्याची पत्नी हर्षाली हिने अरुण याचा मोठा भाऊ प्रमोद यांना याची माहिती दिली. त्यांनी शेतात जाऊन पाहिले असता अरुणचा विद्युत केबलचा शॉक लागल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले. प्रमोद भीमराव पाटील यांनी दिलेल्या खबरीवरून मुक्ताईनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास पोलिस हेड कॉन्स्टेबल अशोक जाधव करत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !