चुंचाळेतील एक लाखांचे लाच प्रकरण : ऑपरेटर पोलिस कोठडीत ; ग्रामसेवक मात्र पसार
One lakh bribe case in Chunchale : Operator in police custody; Gramsevak, however, spread यावल : स्वावलंबन योजनेचा निधी मंजूर झाल्यानंतर त्यापोटी बक्षीस म्हणून एक लाखांची लाच स्वीकारल्याप्रकरणी चुंचाळे ग्रामपंचायतीचा ऑपरेटर सुधाकर धुडकू कोळी (35, चुंचाळे) यास जळगाव एसीबीने अटक केली होती तर मुख्य संशयित तथा चुंचाळे ग्रामसेवक हेमंत कमलाकर जोशी (चुंचाळे) हे पसार झाले होते. ही कारवाई शनिवार, 17 रोजी दुपारी एक वाजेच्या सुमारास करण्यात आली होती. अटकेतील संशयित सुधाकर कोळी यास यावल न्यायालयात हजर केले असता दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.
असे आहे लाच प्रकरण
चुंचाळे येथील 46 वर्षीय तक्रारदाराच्या तक्रारीनुसार, चुंचाळे, ता.यावल गावी त्यांच्या वडिलांच्या नावाची संस्था असून त्यामध्ये 15 वित्त आयोगाच्या शिफारशीतून गावात शिलाई मशीन प्रशिक्षण देवून ग्रामीण भागातील महिला व युवतीना स्वावलंबी करण्यासाबाबत केंद्र शासनाकडून दोन लाख रुपये निधी मंजूर झाला होता. मंजूर निधीतून तब्बल 50 टक्के बक्षीस म्हणून एक लाखांची लाच ग्रामसेवक हेमंत जोशी यांनी शुक्रवार, 16 रोजी मागितली होती मात्र जोशी यांनी लाचेची रक्कम ऑपरेटर कोळीला देण्यास सांगितल्याने सुरूवातीला कोळी यास अटक करण्यात आली तर जोशी सापळ्याची कुणकुण लागताच पसार झाले. अटकेतील कोळी यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. तपास पोलिस उपअधीक्षक सुहास देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाी सुरू आहे.


