रावेर तालुक्यातील पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार : वयोवृद्धाला अटक
Abuse of five-year-old child in Raver taluka : Elderly man arrested रावेर : रावेर तालुक्यातील एका गावातील पाच वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक घटना 18 रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास घडली. संशयित 65 वर्षीय वयोवृद्धाला पोलिसांनी अटक केली आहे.
वयोवृद्धाविरोधात पोस्कोचा गुन्हा
रावेर तालुक्यातील एका गावातील पाच वर्षीय चिमुकलीवर संशयित वामन बळीराम घटे या 65 वर्षीय वयोवृद्धाने अत्याचार केला. चिमुकली ही महिनाभरापूर्वीच आजीकडे आल्यानंतर ही संतप्त घटना घडली. आरोपीला पोलिसांनी अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली.


