भगर, आमटीच्या प्रसादातून चारशे भाविकांना विषबाधा
Bhagar, four hundred devotees poisoned by Amti’s offering बुलढाणा : भगर, आमटीच्या प्रसादातून सुमारे 400 भाविकांना विषबाधा झाल्याची घटना मंगळवार, 20 मध्यरात्री घडली. लोणार तालुक्यातील खापरखेड, सोमठाणा येथे सप्ताहानिमित्त प्रसादाचे आयोजन केल्यानंतर हा प्रकार घडला. दरम्यान, रुग्णांवर बीबी, लोणार आणि मेहकर येथील रुग्णालयामध्ये उपचार करण्यात आले. वर्तमान स्थितीत रुग्णांची प्रकृती स्थीर असून काहींना रुग्णालयातून सुट्टीही देण्यात आली आहे.
भगर-आमटीतून झाली विषबाधा
लोणार तालुक्यातील सोमठाणा येथील भगवान नाडे यांच्या शेतातील मंदिरामध्ये 14 फेब्रुवारीपासून सप्ताह सुरू होता. सप्ताहाच्या सातव्या दिवशी एकादशी असल्याने भाविकांसाठी भगर, आमटीचा प्रसाद तयार करम्यात आला होता. मात्र हा प्रसाद खाल्ल्यामुळे सोमठाणा आणि खापरखेड येथील काही महिला व पुरुषांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना तातडीने बिबी येथील ग्रामीण रुग्णालयात हलव्यिात आले. तेथे डॉक्टरच उपलब्ध नसल्याने खासगी प्रॅक्टीस करण्यात आलेल्या डॉक्टरांना बोलावण्यात आले. रुग्णांची वाढती संख्या पहता रुग्णालयाच्या आवारातच ताडपत्री टाकून झाडाला दोरी बांधून रुग्णांना सलाईन देत उपचार सुरू करण्यात आले.








