रावेर शहरातील विद्या नगरात किराणा दुकान फोडले : 67 हजारांचा किराणा लांबवला


A grocery shop was broken into in Vidya Nagar in Raver City :  67,000 worth of groceries were stolen रावेर  : रावेर शहरातील विद्या नगर भागातील किराणा दुकान फोडत चोरट्यांनी 67 हजार 284 रुपये किंमतीचा किराणा माल लांबवला. हा प्रकार 16 ते 17 फेब्रुवारीदरम्यान घडला. याप्रकरणी रावेर पोलिसात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

चोरीमुळे व्यावसायीकांमध्ये घबराट
विद्या नगरात अक्षय रवींद्र अग्रवाल (26) हे वास्तव्यास असून त्यांचे किराणा दुकान आहे. चोरट्यांनी किराणा दुकानाच्या लोखंडी गेटचे व दरवाजोचे कुलूप तोडून आत प्रवेश करीत तूप, मिरची पावडर, पतंजली सिल्व्हर राईस, उडीद पापडांचे पाकिट, कॅडबरी बॉक्स, पतंजली हल्दी, पतंजली हल्दी साबन, पतंजली एलोवरा कांती साबण, सहा किलो काजू, तीन किलो बदाम, अक्रोड, पिस्ता, जिरे, केसर, उडीद दाळ, तूर दाळ, पतंजली दंत कांती पेस्ट, पतंजली केसाचे ऑईल, महिमा गोल्ड सोयाबीन तेल, पारले बिस्कीट, मॅगी आदी मिळून एकूण 67 हजार 284 रुपयांचा किराणा सामान लंपास केला. अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सहा.निरीक्षक आशिषकुमार अडसुळ यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार सुरेश मेढे करीत आहेत.




मेहनत कर, मेहनत ! कॉपी पेस्ट करू नको !